बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बरंच काही बोलून काहीही न सांगणं हे शरद पवारांचं वैशिष्ट्य”

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाने लिहिण्यात आलेल्या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचं काम दिलं होतं, असा धक्कादायक आरोप या पत्रात करण्यात आला आहे. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.

हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी
महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. अनिल देशमुखांबद्दल निर्णय उद्यापर्यंत घेऊ, असं यावेळी शरद पवारांनी म्हटलं.

गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे, त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवलं आहे. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेले नाहीत, देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र आला, असाही दावा शरद पवारांनी केला. यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

दरम्यान, बरेच काही बोलून काहीही न सांगणे हे शरद पवारांचं वैशिष्ट्य आहे. आजची पत्रकार परिषदही तशीच होती. चौकशा कसल्या करताय, हकालपट्टी करा अनिल देशमुखांची, अशी मागणी अतुल भातखळकरांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

1 लाख रुपयात बुक करा BMW ची शानदार कार; जाणून घ्या किंमत

महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पुढील काही तासांमध्ये कोसळणार पाऊस!

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल- RSS

पबजी गेमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; PUBG Mobile India लवकरच भारतात लाँच होणार

परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन ‘या’ केंद्रीय मंत्र्याची ठाकरे सरकारवर बोचरी टीका, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More