बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”

मुंबई | गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या टाटा कॅन्सर रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या 100 सदनिका देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांवर निशाणा साधलाय.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्रआव्हाड यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या निवाऱ्यासाठी जवळच्या सुखकर्ता-विघ्नहर्ता सोसायटीत काही घरे देण्याचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर केला होता. परंतु सहीच्या एका फटकाऱ्यासह मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द केला. माणुसकी खड्ड्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार आहेत, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.

आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले. परंतु कुरघोडीच्या राजकारणात त्यांनी माणुसकीचा मात्र बळी दिला. राजकारणाने नीच पातळी गाठली आहे, अशी बोचरी टीका भातखळकर यांनी केलीये. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या स्थगितीच्या निर्णयावर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी या एका उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांपासून कुठलिही गोष्ट लपवून ठेवली नव्हती. ते आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेत नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

‘भावा गर्लफ्रेंड iphone मागत आहे’; चाहत्याच्या प्रश्नावर सोनूचं भन्नाट उत्तर, म्हणाला….

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांना 12वीपर्यंत माेफत शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद”

कोरोनामुक्त गावांमध्ये 10-12वीचे वर्ग पुन्हा सुरु होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकारेंनी दिले ‘हे’ निर्देश

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More