बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोक पावसामुळे मेली तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत”

मुंबई | पावसामुळे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडल्या. मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने 30 नागरिकांचा बळी घेतला. अनेक नागरिकांचा मृत्यू दरड आणि भिंत कोसळून झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये 12 नागरिक जखमी झाले. यावरून विरोधकांनी महापालिकेवर सडकून टीका केली आहे. आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मुंबईत लोक पावसामुळे मेली तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर, अशी बोचरी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी या सदंर्भात एक ट्विट केलं आहे.

मुंबई शहरात रेस्क्यू टीम स्पॉटवर टेवा. तसेच अतिधोकादायक इमारती, डोंगराळ भागातील रहिवाशांचे लवकरात लवकर स्थलांतर करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील आपात्कालीन विभागातील अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीत अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. तसेच आगामी काही दिवसांमध्ये पावसाची स्थिती कशी असेल याबाबत सविस्तर सांगितलं.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“जास्त आगाऊपणा करू नका, जेवढी स्क्रिप्ट दिली, तेवढंच बोला”

“शरद पवारांनी एनडीएत यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं”

मुंबईमध्ये रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा, धोकादायक इमारतीमधील लोकांचं स्थलांतर करा- उद्धव ठाकरे

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच ‘या’ राज्यात मिळणार प्रवेश

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More