Top News

“पूजा चव्हाणला न्याय देण्याची तुमच्यात धमक नाही”

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणी भाजपने शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. याप्रकरणावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होईल, त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रकार समोर आले होते. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणलं जाईल. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल ती केली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

फक्त ट्विटरवर टीका करणाऱ्या विरोधकांवर कारवाई करण्याची तुमची योग्यता आहे. पक्षाच्या नेत्यावर कारवाई करून पूजा चव्हाणला न्याय देण्याची धमक तुमच्यात नाही, अशी बोचरी टीका अतुल भातळकर यांनी केली आहे.

परळीची असलेल्या पूजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली. हे प्रकरण सध्या चर्चेत आहे.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आरजे राघव… पोराच्या एका व्हिडीओनं आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय!

“दाढी वाढवून स्वत:ची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही”

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?”

“महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या