बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अहो जनाची नाही, मनाची तरी बाळगा’; भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई | शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार आहे. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तपस्वी क्रांतिकारकाला बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मुखपत्राला पोलीस कारवाईपासून अभय देणारे मुख्यमंत्री सावरकर स्मारकात दसरा मेळावा घेतात. अहो जनाची नाही तरी मनाची बाळगा, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर अद्यापही बंधनं कायम आहेत. त्यामुळं शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार असल्याची माहिती मिळतं आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊतांना विचारले असते, त्यांनी यंदाचा दसरा मेळावा हा व्यासपीठावरच होणार अशी भूमिका मांडली होती.

Shree

महत्वाच्या बातम्या-

लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या म्हणत शेतकऱ्यांच्या संतप्त जमावाने हसन मुश्रीफांची गाडी रोखली!

पंकजा मुंडेना ऑफर देणाऱ्या खोतकरांना विचारतंय कोण?; फडणवीसांचा टोला

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण…- रामदास आठवले

“भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील लोकांना कोरोनाची लस मिळणार नाही का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More