बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पोलिसांकडून खंडणी वसूली करून घेतली की असे राक्षस बोकाळणारच दादा”

मुंबई | काल पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका 14 वर्षीय मुलीचा निर्घृण खून करण्यात आला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या घटनेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.

अजित पवारांनी आपल्या संवेदना आणि संताप व्यक्त केल्यानंतर त्यांच्या या विधानावर भाजप आमदार अतूल भातखळकर यांनी टीकास्त्र डागलं आहे. ‘पोलिसांकडून खंडणी वसूली करून घेतली की, असे राक्षस बोकाळणारच’, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर शरसंधान साधलं आहे.

भाजपकडून या घटनेविरूद्ध आणि महाविकास आघाडीविरुद्ध मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. भातखळकर यांनी ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नुसता पोकळ संताप व्यक्त करून काय साधणार? असं म्हणत अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

सध्या संपुर्ण राज्यभरातून या घटनेवर संताप व्यक्त होत असून आरोपींना मोठ्या शिताफीने पुणे पोलिसांनी जेरबंद केलं आहे. असं असलं तरी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

थोडक्यात बातम्या

“फडणवीस मुख्यमंत्री असताना खुट्ट झालं तरी बोंबाबोंब व्हायची”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंचा पुन्हा आक्रमक पवित्रा

देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत चढ-उतार सुरूच, वाचा आकडेवारी

संजय राऊतांचा बैठकींचा सपाटा; पुण्यात मोर्चेबांधणीला केली सुरूवात

या भाजपच्या नेत्यांवरील आरोपाचं पुढे काय झालं? राष्ट्रवादीचा पोस्टर्समधून किरीट सोमय्यांना सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More