बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महापुरास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप न केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद”

मुंबई | गेल्या जूलै महिन्यात कोकणातील चिपळूण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये हाहाकार माजल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, या झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे कुटूंब उध्वस्त झाले. तर या सर्व घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

चिपळूण व परिसरात 22 आणि 23 जूलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने महापूराची परिस्थिती ओढावली, त्याला केंद्र किंवा राज्य सरकारचं दुर्लक्ष कारणीभूत असल्याचं म्हणणं चुकीचं आहे, असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

‘पाऊसच चिपळूणच्या महापूराला जबाबदार असल्याचं सांगत राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात हलगर्जीपणाचे आरोप फेटाळले आहेत. पण चिपळूणच्या महापूरास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप न केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद’, असं म्हणत अतुल भातखळकरांनी महाविकास आघाडीवर कडवट टीका केली आहे.

दरम्यान, पावसाने किती पडावे हे देखील मुख्यमंत्र्यांना विचारायला हवे का?, असं म्हणत भातखळकरांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

थोडक्यात बातम्या

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आधी स्वत:च्या मुलांना सीमेवर पाठवावे, मग….

पंकजा मुंडे भाजपवर नाराज? ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

दिलासादायक! देशात 538 दिवसानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

अनुपमा मालिकेतील ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं दु:खद निधन

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा संचारबंदीचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More