बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खंजीर खुपसून स्वतःचा विकास करण्याचा मार्ग…”

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विविध मुद्द्यांवरून राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी टीकेची एकही संधी सोडत नाही. त्यातच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामतीमध्ये इनक्यूबेशन सेंटरचं उद्घाटन केलं. त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच सध्या होत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुनही भाजपवर निशाणा साधला.

काल राज्याचे माजी गृहमंत्री आणि देशमुख यांना अटक करण्यात आली आणि अजित पवारांनाही आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आली होती. या सर्व प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पवार कुटुंबीयांचं कौतुक करत पवार कुटुंबीयांनी विकासाचा मार्ग दाखवला, असं विधान केलं होतं.

या सर्व प्रकरणावरून आता भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आणि पवारांना खोचक टोला लगावल्याचं पाहायला मिळत आहे. “खंजीर खुपसून स्वतःचा विकास करण्याचा मार्ग पवार कुटुंबीयांनी दाखवला, असं वाचावं”, असं म्हणत भातखळकर यांनी एका बातमीच्या शीर्षकाचा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे.

भातखळकर यांनी केलेल्या टीकेमुळे त्यांनी थेट पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजप केंद्र यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असला तरी भाजपही त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

“…म्हणून नवाब मलिक आणि ज्यांच्यावर आरोप केले त्या सर्वांची नार्को टेस्ट करा”

“उद्धवजी राजीनामा द्या आणि सरकार बरखास्त करा…”

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकला! दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय

यंदा पावसाप्रमाणे थंडीचाही कहर; राज्यातील ‘या’ भागांना पाऊस झोडपणार

“दिवाळीनंतर बॉम्ब फोडाच, पण आवाज येऊ द्या, नुसता धूर नका काढू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More