बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करू नये”

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरून राजकारण चांगलंच पेटलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच संजय राऊतांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. यावरून भाजप आमदार अतूल भातखळकर यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका करत ‘इतक्या पराकोटीचे कोडगे वक्तव्य करण्यासाठी कोणत्या प्रतीचा गांजा लागतो हे राऊतच सांगू शकतात’, असा टोला संजय राऊतांना लगावला आहे. त्याचबरोबर ‘सत्तेसाठी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता मारू नये’, अशी बोचरी टीकाही यावेळी केली आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या मागणीचा खरपूस समाचार घेत आता अतुल भातखळकर यांनी चांगलीच गंभीर टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानुसार आता संजय राऊत भातखळकरांच्या टीकेला कसं प्रत्युत्तर देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर होणारी चिखलफेक थांबवण्यासाठी संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना थेट आव्हान देत सावकरांना भारतरत्न देऊन सन्मानित करा, असं म्हटलं आहे. त्यामुळे सावरकरांच्या नावावरून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटताना पाहायला मिळत आहेत.

थोडक्यात बातम्या

पुन्हा राज्यानं पाहिला नानाभाऊंचा कणवाळूपणा! लोककलावंताला दिलं हक्काचं घर

विराट कोहलीने ठोकलं दमदार अर्धशतक! पाकला दिलं ‘इतक्या’ धावांचं आव्हान

लखीमपूर खीरी घटनेतील मुख्य आरोपीला झाली डेंग्युची लागण

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More