बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अहो बेस्ट मुख्यमंत्री… जनतेला दिसू तर द्या तुमची मर्दानगी”

मुंबई | राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध करत गंभीर इशारा दिला होता.

पुन्हा कोणत्या महिलेवर पुरूषाने हात उचलला तर मी स्वत: त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन. कोर्टात जाईन केसही लढवेन, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. कोणत्याही परिस्थितीत एक पुरुष महिलेला मारहाण करतो हे अजिबात स्वीकारार्ह नाही. या अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलंय.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. कानफाटात मारावीशी वाटली होती या वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करणारे मर्दांचे महाविकास आघाडी सरकार आता हात तोडण्याची भाषा करणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळेंवर तशीच कारवाई करणार ना?, असा सवाल त्यांनी केलाय.

दरम्यान, अहो बेस्ट मुख्यमंत्री… जनतेला दिसू तर द्या तुमची मर्दानगी, असा टोला अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.

 

 

थोडक्यात बातम्या- 

राज ठाकरेंनी पुण्यात दीड तासात खरेदी केली ‘इतक्या’ हजारांची पुस्तक!

“निवडून यायचं एकाच्या जीवावर अन् दुसऱ्यांची चाकरी करायची”

“भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जा, माफीचीही गरज नाही”

मान्सून संदर्भात मोठी अपडेट; राज्यात ‘या’ दिवशी होणार पावसाचं दमदार आगमन

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या राजकीय निवृत्तीबाबत काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More