बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारच्या कोट्यातून मोफत लस द्या”

मुंबई | कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत असून डॉक्टर, नर्स आणि पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी आता लसीकरणावर भर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लसीबाबत एक मागणी राज्य सरकारला केली आहे.

राज्यातील 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना ठाकरे सरकारने त्यांच्या कोट्यातुन मोफत लस देण्याची व्यवस्था करावी अशी माझी मागणी आहे. राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारकडे बोट न दाखवता थोडा भर स्वतः उचलायला हवा, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

देशातील अनेक मध्यप्रदेश, बिहार या राज्यांनी मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित लोकांची संख्या जास्त असल्यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाला आहे. सद्यस्थितीतील टाळेबंदी लावण्याच्या आधीसुद्धा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दोन दोन आठवडे टाळेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना सरकारने आता तरी मदत करावी, असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याची मुभा दिली आहे. त्यानंतर आता ठाकरे सरकार थेट लस उत्पादक कंपन्यांकडून लस घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सिरम इन्सिट्यूटकडून कोव्हीशिल्ड लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

कौतुक करावं तेवढं कमी! मयुर शेळके 50 हजारांपैकी निम्मी रक्कम त्या अंध मातेला देणार

‘हे केंद्र सरकारचं काम नाही, जबाबदारी राज्यावर सोपवावी’; राज ठाकरेंचं मोदींना दुसरं पत्र

ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत आम्ही पाया देखील पडायला तयार- राजेश टोपे

महाराष्ट्राला 20 कोटी लस मिळणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदर पुनावालांशी चर्चा

‘या समाजाचा भाग असल्याची लाज वाटते’; उच्च न्यायालयानं ठाकरे सरकारला फटकारलं

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More