बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…मग आता संजय राठोड यांना अटक करा- अतुल भातखळकर

मुंबई | बीड मधील परळी वैजनाथ येथील रहिवासी असणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी परिसरात आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर याप्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. यावरून भाजपने संजय राठोडांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत सरकारवर दबाव टाकम्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्त केला असल्याची माहिती मिळत आहे.

ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गब्रूचा राजीनामा. महाराष्ट्राच्या जनतेची जराही चाड असेल तर आता तरी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना अटक करा, असं म्हणत भातखळकरांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  त्यामुळे राठोडांच्या राजीनाम्यानंतर हे प्रकरण शांत होईल असा अंदाज वर्तवला जात होता मात्र, अतुला भातखळकरांच्या या ट्विटनंतर हे प्रकरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

संजय राठोड यांनी राजीनामा देण्याआधी मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल एक तास चर्चा झाली. या चर्चेवेळी शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी यावेळी यंजय राठोड यांची बाजू मुख्यमंत्र्यांजवळ मांडत लगेच राजीनामा न स्वीकारण्याची विनंती केली होती. मात्र विरोधी पक्षाचा वाढणारा दबाव आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचा विचार करता मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारल्याची माहिती मिळत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

संजय राठोडांना आणखी एक मोठा धक्का, पूजाच्या कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती तक्रार करण्यास आली पुढे!

सर्वात मोठी बातमी, अखेर संजय राठोडांनी राजीनामा दिला

पूजा चव्हाण प्रकरणी भाजपकडून नीलम गोऱ्हे टार्गेट; ताई लवकर या आणि भूमिका घ्या!

संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका, नाहीतर… पोहरादेवीच्या महंतांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा

पुण्यात शाळा, महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत बंद; वाचा महापालिका आयुक्तांचा नवा आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More