Top News क्राईम पुणे महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे ‘या’ आमदाराला येत आहेत धमक्यांचे फोन!

Photo Courtesy- Instagram/Pooja Chavan

पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. याप्रकरणावरून महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली.

शिवसेनेच्या एका मंत्र्याचा या प्रकरणात थेट संबंध असल्याचा आरोप भाजप महिला आघाडीकडून करण्यात येत होता. भाजपच्या चित्रा वाघ यांनी तर थेट नाव घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील उद्धव ठाकरेंना या प्रकरणासंबंधी पत्र व्यवहार केला होता. या सर्व प्रकरणात आवाज उठवल्यामुळे मला धमकीचे फोन येत असल्याचं अतुल भातखळकर म्हणालेत. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून झुंडशाही बळावल्याचं म्हणत भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मी अशा धमक्यांना घाबरत नाही, हे सरकारच्या प्रायोजित गुंडांनी लक्ष्यात घ्यावं, असं भातखळकर बोलले.

याआधी अतुल भातखळकर यांनी वनमंत्री संजय राठोड यांचं पूजा चव्हाण प्रकरणात नाव पुढे येत असल्याने त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

 

थोडक्यात बातम्या-

आता मनसेच्या अमित ठाकरेंचीही शिवसेनेवर टीका, म्हणाले…

ज्युनिअर तेंडुलकरवर ‘हे’ तीन संघ लावणार बोली?

आई-वडिल घरात नसताना पाच वर्षाच्या चिमुरडीसोबत नराधमाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य!

‘ये नयन डरे डरे’; अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित, पाहा व्हीडिओ

‘एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले’; दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी संतापल्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या