बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पालघर प्रकरणातील मृताच्या पीडितास ‘या’ भाजप आमदाराकडून आर्थिक मदत

मुंबई | पालघर जिल्ह्यात झालेल्या मॉब लिचिंगच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटले. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. या प्रकरणातील मृताच्या कुटुंबाची भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भेट घेतली आहे.

पालघर हत्याकांडात मृत्यू झालेल्या नीलेश तेलगडे याच्या कुटुंबाची भेट घेऊन अतुल भातखळकर यांनी त्यांचं सांत्वन केलं आहे. तसेच या कुटुंबाला 1 लाख रूपयांची आर्थिक मदत केली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

पालघर हत्याकांडात मृत्यू झालेला नीलेश तेलगडे हा माझ्या मतदारसंघातील तरुण होता. त्याच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आज मी त्यांची भेट घेतली. नीलेशला दोन लहान मुली आहेत. घरात उत्पन्नाचं साधन नाही. त्यामुळे आर्थिक हातभार म्हणून एक लाख रुपयांचा चेक दिला, असं ट्विट भातखळकर यांनी केलंय.

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून तीन साधूंची जमावानं हत्या केली होती. रात्री डहाणू तालुक्यातील गडचिंचले परिसरात दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाला गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“यांना साधू गेल्याचं दु:ख नाही तर त्यानंतर पेटवापेटवी अपयशी ठरली याचं वाईट वाटतंय”

…मग तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा महाराष्ट्र नव्हता का?; सामनाच्या अग्रलेखातून सवाल

महत्वाच्या बातम्या-

‘परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा’; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

आधी ‘मातोश्री’जवळचा चहावाला, आता ‘वर्षा’वरील महिला पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

मुंबई-पुण्यातील लॉकडाउनमधल्या सवलतीबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More