बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल”

मुंबई | आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. अधिवेशनादरम्यान विविध मुद्यांवरुन विरोधक आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. ओबीसींच्या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने विधानसभेत मोठा राडा झाला. या गदारोळात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा देखील समावेश आहे. यावरुनच आता अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल, अशी गंभीर टीका भातखळकर यांनी केली आहे. धक्काबुक्की कोणीही केली नाही. शिवसेना आमदारानेच शिवीगाळ केली आहे. आपण गोंधळ झाला त्यावेळी डायसवर देखील गेलो नव्हतो. मात्र, शिवसेनेवर, सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो म्हणून माझं निलंबन करण्यात आलं आहे, असा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

तसेच जरी 106 आमदारांचं निलंबन करण्यात आलं तरी देखील आम्ही ओबीसी आरक्षणासाठी हा लढा सुरुच ठेवू. 12 आमदारांच्या निलंबनानंतर आमचं संख्याबळ कमी झालं तरी देखील अकेला देवेंद्र काफी है. आमचे नेते देवेंद्र सांगतील त्याप्रमाणे लढण्यात येईल, असं देखील भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या – 

भाजपचे निलंबित 12 आमदार आज घेणार राज्यपालांची भेट; राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

‘आरएसएस प्रमुख म्हणजे मुंह में राम, बगल में छुरी आहेत’; मोहन भागवतांच्या वक्तव्यावर मायावती भडकल्या

अबब… रिंकू राजगुरु उर्फ आर्चीने दाखवली तिची जोरदार फिगर, पाहा फोटो

‘आमदारकी गेली तरी चालेल पण…’; निलंबित आमदार आमदार राम सातपुतेंचा सरकारवर घणाघात

“शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रुपाने नवे तालिबानी महाराष्ट्रावर राज्य करू पाहत आहे”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More