बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचे लोक देखील गांभीर्योने घेत नसावेत”

मुंबई | मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये पत्रकार परिषद बोलावली होती. राज्यावर ओढावलेल्या संकटाबद्दल बोलताना या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. तसेच पूरग्रस्त भागात नेत्यांनी आणि मंत्र्यांनी विनाकारण जाणे टाळावे, असं आवाहन देखील पवार यांनी यावेळी केलं आहे.

शरद पवारांनी केलेल्या या आवाहनानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी पवारांना चांगलंच धारेवर धरलं आहे. या मुद्यावरून भाजप नेते पवारांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील या मुद्यावरुन पवारांवर घणाघात केला आहे. पवारांना बाहेरचे सोडा घरचे लोक देखील गांभीर्योने घेत नसावेत, अशी टीका भातखळकरांनी केली आहे.

भातखळकर यांनी ट्वीट करत पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. जाणते पवार आज बोलतात. उद्या कोलांटी मारतात. त्यामुळे बाहेरचे सोडा घरचे लोक देखील त्यांना गांभीर्याने घेत नसतील, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काल पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा त्या ठिकाणी मदतकार्य होणे गरजेचं असतं. नेत्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागात दौरे केल्यास त्यांच्यासाठी यंत्रणा फिरवावी लागते. यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागात ज्यांच्या संबंध नाही त्यांनी जाणे टाळावं.

थोडक्यात बातम्या –

“भाजपवाले मत मागायला येतील दोन पायांवर पण जातील चौघांच्या खांद्यावर”

राज कुंद्राने लॅाकडाऊनमध्ये फक्त पाचच महिन्यात कमावले ‘एवढे’ कोटी रुपये!

“भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला”

धक्कादायक! पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अभिनेत्रीचा मृत्यू

काळजाचा ठोका चुकवणारी घटना!; विहिरीत पडलेल्या सासूला वाचवण्यासाठी सुनेनं…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More