महाराष्ट्र मुंबई

“आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत”

मुंबई | राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही मनीषा प्रत्येकाचीच असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली.

जयंत पाटील यांच्या या वक्तव्याचा भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार समाचार घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलंय.

आता महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय, जयंत पाटीलांचा मोठा गौप्यस्फोट… आता महाविकास आघाडीतील फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायची बाकी आहेत…, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“एमपीएससी संदर्भात आम्ही मार्ग काढू”

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग!

जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया; पाटील हे…

…तर जयंत पाटील मुख्यमंत्री होणार; अजित पवारांनीही दिला पाठिंबा

प्रबोधनकारांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही- उर्मिला मातोंडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या