महाराष्ट्र मुंबई

“शरद पवारांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची”

मुंबई | शरद पवार यांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची आहे, अशी बोचरी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

पॉवर ट्रेडिंग’ हे या पुस्तकात शरद पवार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलल्याचा उल्लेख आहे. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सगळा वृत्तांत सांगितला आहे. शरद पवार यांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या सोबत येण्याचे मान्य केले होते. काळाच्या ओघात सर्व घटना उघड होतील, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी आम्हाला दम दिला. त्यांना आम्हाला सांगायचं आहे की असे दम-बिम देण्याची भाषा करु नका. ही भाजप आहे. आम्ही इंदिरा गांधींना ऐकलं नाही, तर तुम्ही कोण आहात, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

एक देश आणि एक निवडणूक ही भारताची गरज, राष्ट्राच्या हितात राजकारण नको- नरेंद्र मोदी 

पुण्यात मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडले मोठे हाडांचे अवशेष

दौऱ्यावर गेलेल्या 6 पाकिस्तानी खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह!

“सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले” 

आम्ही सुपारी घेणारे, मग तुम्ही हप्ते घेणारे आहात का?; मनसेचा शिवसेनेला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या