मुंबई | मुख्यमंत्र्याच्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला. यानंतर कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चं ट्विटर हॅंडल करणाऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ, असं मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी सांगितलं. यावरून भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
संभाजीनगर प्रकरणी निलाजरी माघार घेतल्यानंतर आता जनाबसेनेने उगाच मिशांना पीळ देऊ नये. राज्यातील शिवप्रेमी जनतेला तुमची लायकी कळली, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादच्या उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. मुंबईत बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानं मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 3 ट्वीट करत नाराजी व्यक्त केली.
संभाजीनगर प्रकरणी निलाजरी माघार घेतल्यानंतर आता जनाबसेनेने उगाच मिशाना पीळ देऊ नये… राज्यातील शिवप्रेमी जनतेला तुमची लायकी कळली…@OfficeofUT @MiLOKMAT pic.twitter.com/bh4cEQ78jU
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 7, 2021
थोडक्यात बातम्या-
‘त्या’ ट्विटची शहानिशा करूनच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेन- अजित पवार
“थोरातांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली”
‘तुम्ही मर्द असाल तर…’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
गोणीत घालून नाल्यात फेकलं तो २४ तास ओरडत होता; धक्कादायक कारण आलं समोर
अमृता फडणवीसांचं नवं गाणं; ‘डाव मांडते भीती’!