महाराष्ट्र मुंबई लातूर

“पैशांसाठी ठाकरे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का?”

मुंबई | राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणं कितीपत योग्य आहे यासाठी वित्त विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेखाली समिती नेमून अहवाल मागविला होता. त्या अहवालानुसार राज्यात लवकरच जुगाराला अधिकृत करणार असल्याचे संकेत या सरकारने दिले आहेत, असं भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितलं आहे.

आयपीएल सुरु होत असलेल्या दिवशीच याची माहिती लोकांना होणं म्हणजे सध्या सुरु असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंगला अभय देण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. पैशांसाठी ठाकरे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.

राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ठाकरे सरकारचा ऑनलाईन जुगाराला अधिकृत करुन गरिबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे, असा आरोप अतुल भातखळकरांनी केलीय. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.

राज्याचं करेत्तर उत्पन्न वाढवण्यासाठी इतर चांगले मार्ग शोधायचे सोडून सरकार गरिबांना उद्ध्वस्त करण्याचा मार्ग स्वीकारत आहे. यातून ठाकरे सरकारच्या नीतिमत्तेची पातळी दिसून येते. लॉटरी लागून सत्तेत आलेले हे सरकार जुगाराला पाठिंबा देणारच, असा टोला अतुल भातखळकर यांनी सरकारला लगावला.

महत्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! राज्यात आज 23 हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

रुग्णालयाचं बिल पाहून रुग्णाची हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

“मी महाराष्ट्रात सुरक्षित आहे, उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली”

सरदार तारासिंग यांच्या निधनाने एक सच्चा समाजसेवक हरपला- देवेंद्र फडणवीस

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण; स्वतः ट्विट करुन दिली माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या