बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे, असं म्हटलं होतं.

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी जवानांचा अपमान केला आहे, असा आरोप भाजपने केलाय. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

चीनसमोर पळ काढे असं निलाजरं विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत, अशी बोचरी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

जवानांचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीदेखील अतुल भातखळकर यांनी केली आहे. जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच, असंही अतुल भातखळकर म्हणालेत.

 

थोडक्यात बातम्या-

‘कल हो ना हो’ मधील जियाला ओळखणं झालंय कठीण, पाहा आता कशी दिसते

…तर तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत- असदुद्दीन ओवैसी

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला ‘हा’ गंभीर आरोप

खळबळजनक! नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

धक्कादायक!! औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये महिलेसोबत घडला ‘हा’ प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More