महाराष्ट्र मुंबई

“ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघाल्याचं हे आणखी एक उदाहरण”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं सरकारला फटकारलं आहे. किती जणांवर अटकेची कारवाई करणार?, असा सवाल न्यायालयानं सरकारला केला आहे.

सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेकडे पाहता राज्य सरकारने त्या टीकेचा सामना करायला हवा. कारण अशा किती टीकाकारांविरुद्ध राज्यसरकार खटले दाखल करणार? त्यापेक्षा अशा टीकेकडे दुर्लक्ष करा, असं न्यायालयानं म्हटलंय. उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

राज्य सरकार सोशल मीडियावरील किती टीकाकारांविरुद्ध खटले दाखल करणार ? दुर्लक्ष करायला शिका… अशी समज अखेर मुंबई उच्च न्यायालयाला सूडबुद्धी ठाकरे सरकारला द्यावी लागली. हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केलीये.

 

महत्वाच्या बातम्या-

“मास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या”

तुटवडा की छपाई बंद???; आता एटीएममध्ये मिळणार नाहीत ‘या’ नोटा!

“मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रमाणिक भावना”

“बाप तरी दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ही वेळ आली आहे… मराठा आरक्षण दिरंगाईला….”

संजय राऊत लिलावती रूग्णालयात होणार दाखल; अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या