बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“स्वप्नीलच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटायला जावं लागलं, हे निबर कातडीचं सरकार”

मुंबई | MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आज त्याच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. मात्र यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

स्वप्नीलच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर यावं लागलं, हे संवेदना हरवलेलं सरकार आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केलीये. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

दुर्दैवी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अखेर मुख्यमंत्र्याना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केलं तसं स्वप्नीलच्या घरी जाता आलं नसतं का? हे तर निबर कातडीचं सरकार, संवेदना हरवलेलं सरकार, असं ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका,अशा शब्दांत स्वप्नीलच्या कुटुबियांना धीर दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचं सांत्वनही केलं. तसेच स्वप्नीलची बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असं आश्वस्तही केलं. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल. यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

थोडक्यात बातम्या- 

‘ही’ अभिनेत्री लवकरच करणार कमबॅक; दाऊदसोबतच्या संबंधांमुळे आली होती चर्चेत

संजय राठोडांच्या क्लीन चिटवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

अथिया-राहुलच्या नात्यावर सुनील शेट्टीनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

काॅमेडी किंग जाॅनी लिव्हर लावणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर हजेरी

“ठाकरे सरकार हँग झालंय त्यामुळे निकालाची वेबसाईट ‘हँग’ली तर नवल काय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More