बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना मोदी नॉन परफॉर्मिंग असेट वाटणं स्वाभाविक”

मुंबई | नरेंद्र मोदी हे नॉन परफॉर्मिंग असेट आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. याला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) म्हणाले. UPAच्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी… असे अनेक परफॉर्मन्स पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणं स्वाभाविकच, असा टोला अतुल भातखळकर यांनी पृथ्वीराज चव्हाणांना लगावला आहे.

मोदी हे देशातील सर्वात मोठे नॉन परफॉर्मिंग अॅसेट आहेत, असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं होतं. त्यांनी या संदर्भात एक फोटो ट्विट केला होता. चव्हाण यांनी गंगा नदीत वाहून येत असलेल्या मृतदेहांवरुनही भाजपवर जोरदार टीका केली होती.

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोना उद्रेकामुळे कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. तसेच केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

खरं का काय! कोंबडा बोलू लागला अल्लाह ,अल्लाह; पाहा तुफान व्हायरल व्हिडीओ

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

ओव्हर एक्टिंगचे 50 कट! लस घेताना केलेल्या ड्रामामुळे मराठी अभिनेत्री झाली ट्रोल

सकारात्मक बातमी | कॅन्सरग्रस्त 3 वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, रुग्णालयात जल्लोष, पाहा व्हिडीओ

मराठा समाजासाठी 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More