बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तो शुद्ध हलकटपणा होता’; नितीन राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकर संतापले

मुंबई | उर्जा विभागाकडून सध्या थकीत वीज बील कृषी पंपांचं वीज कनेक्शन कापण्याचं काम वेगाने सुरू आहे. तर दुसरीकडे नुकतीच पेरणी करण्यात आलेल्या गहू, ज्वारी, ऊस, हरभरा यासारख्या पिकांना पाणी द्यायचं काम सुरू आहे. अशातही वीज कापण्याचं काम सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

वीज कनेक्शन कापण्याच्या या मोहिमेविरोधात भाजपकडून (BJP) आंदोलन केलं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना वीज फुकटात तयार होत नाही, कर्ज काढावं लागतं असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी नितीन राऊतांवर निशाणा साधला आहे.

‘वीज फुकटात तयार होत नाही. त्यासाठी कोळसा, पैसा, कर्ज काढावं लागतं असं संतापून ऊर्जामंत्री म्हणाले. म्हणजे निवडणुकीच्या आधी मतदारांना दिलेली फुकट आणि स्वस्त वीजेची आश्वासनं हा शुद्ध हलकटपणा होता,’ असा घणाघात अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे.

वीज फुकटात कधी पासून मिळायला लागली? कोळसा,पाणी यापासून वीज तयार होते, त्याला पैसे मोजावे लागतात. वीज वापरतात मग वीज बील भरायला नको का वाटतं? अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली होती. या वक्तव्यावरून स्वस्त वीजेची आश्वासनं खोटं असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांचा मोठा निर्णय, आता खासगी फोटो आणि व्हिडीओ…

‘2024 मध्ये 300 खासदार निवडून येतील असं वाटत नाही’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा घरचा आहेर

बायकोचा वाढदिवस विसरणं पडू शकतं महागात; ‘या’ देशाने केलेला कायदा वाचून थक्क व्हाल

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More