बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बुळबुळीत टोमणे मारण्याचं पेटंट मुख्यमंत्र्यांकडेच, पंतप्रधानांनी तर नाव घेऊन कानाखाली जाळ काढला”

मुंबई | देशातील कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोनाबद्दल बोलताना इंधनवाढीवरून देखील मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. यावरून बिगरभाजप राज्यातील मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या कोरोना स्थितीबाबत असलेल्या बैठकीत इतर विषयांवरच जास्त तारा छेडल्या. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत टोमणे मारण्याचंच काम जास्त झालं, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. राऊतांच्या या टीकेवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पलटवार केला आहे.

त्याला टोमणे म्हणत नाहीत. पंतप्रधानांनी नाव घेऊन कानाखाली जाळ काढलाय. बुळबुळीत टोमणे मारण्याचं पेटंट फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांकडेच, अशी जळजळीत टीका अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. भातखळकरांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांची सत्ता असेलेल्या राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील मूल्यवर्धित करात कपात करावी असा सल्ला नोव्हेंबर महिन्यात दिला असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांनी हा सल्ला मानला नसल्याचंही पंतप्रधान म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचाही सरकारला डोस, भाजपची रविवारी बूस्टर डोस सभा

शरद पवारांचा ‘शकुनी काका’ असा उल्लेख करत पडळकरांचा हल्लाबोल, म्हणाले..

ट्विटरनंतर एलॉन मस्क खरेदी करणार ‘ही’ मोठी कंपनी, ट्विट करत म्हणाले…

खऱ्या आयुष्यातील जोडी मोठ्या पडद्यावरही एकत्र, ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील खास फोटो समोर

मोठी बातमी! या अटी-शर्तींसह राज ठाकरेंची सभा होणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More