बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे खोटं बोलतायत, त्यांच्यामुळे दिवसाला पाच कोटीचं नुकसान होत आहे”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी आहे. कारण ही जमीन कोर्टकज्ज्यात अडकलेली आहे. मुंबईत कारशेडसाठी फक्त आरेची जमीन उपयुक्त असल्याचा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल असताना ही उठाठेव कशाला?, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

मेट्रो कारशेडच्या कामाला मागच्या नऊ महिन्यापासून स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रातील जनतेचे दिवसाला पाच कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. अशी खोटी वक्तव्य केल्याबद्दल मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो, असं अतुल भातखळकर म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबाबत गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

लोकल, जीम केव्हापासून सुरु होणार?, मुख्यमंत्री म्हणाले…

काँग्रेसच्या राजस्थानमध्ये कायद्याचं नव्हे तर जंगलराज सुरू- मायावती

200 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा कोरोनाने मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More