“सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागतं”
मुंबई | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा सुरु झाली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आले होते, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना हाताशी धरत सत्तास्थापनेचा दावा केला.
देवेंद्र फडणीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील अशी घोषणा करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. यानंतर भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांचं भरभरून कौतुक केलं आहे.
सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागते, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. तर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील देवेंद्र जी तुमच्या त्यागाला सलाम असं म्हणतं ट्विट केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
फडणवीसांची मोठी खेळी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरकारचं रिमोट देवेंद्र फडणवीसांकडे?
देवेंद्र फडणवीसांसारखी माणसं राजकारणात दुर्मिळ, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला- एकनाथ शिंदे
पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार
फडणवीस आणि शिंदेंच्या शपथविधीसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर!
Comments are closed.