महाराष्ट्र मुंबई

“तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीज बिलांच्या सवलतीचा निर्णय घ्यावा. याबाबत निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

भाजपने आज मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बोलताना अतुल भातखळकर यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

कोरोनाच्या काळात भरमसाठ वीज बिल अदा करणाऱ्या ठाकरे सरकारला आगामी काळात महाराष्ट्रातील जनता ‘शॉक’ दिल्याशिवाय राहणार नाही, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

श्रेयवादाच्या लढाईत राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे दुष्पाप हे महाविकास आघाडी सरकार करीत आहे. परंतु जो पर्यंत राज्यातील जनतेला 300 युनिट पर्यंतची सवलत व वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही तो पर्यंत भारतीय जनता पक्षाचे हे आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिलाय.

महत्वाच्या बातम्या-

वीज ग्राहक आमचा देव आहे, त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही- नितीन राऊत

…तर ठाकरे सरकार काय फक्त गोट्या खेळायला बसलंय का?- निलेश राणे

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल- राजेश टोपे

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान!

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा- आशिष देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या