बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, तर राहुल गांधींना पंतप्रधान व्हावसं वाटतंय, पण…”

मुंबई | एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीमुळे अनेक तर्क वितर्क लावले आहेत. शरद पवार यांनी भविष्यातही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणुक लढणार असल्याचं म्हणाले होते. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर निवडणुक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे.

नाना पाटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय… राहुलजींनाही वाटतंय पंतप्रधान व्हावसं… जनतेला असं अजिबातच वाटत नाही. भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्वविट केलं आहे. अतुल भातखळकरांनी ट्विटमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नाना पटोलेंना टॅग केलं आहे.

आम्ही आजपासूनच जाहीर करतोय. आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत. त्यामुळे आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. मित्रपक्षांना देखील आमचा संदेश आहे की तुम्हीही तयारी सुरू करा, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. नानांनी प्रशांत किशोर यांनी दोन वेळा सांगितलय की, राहुल गांधी पंतप्रधान होणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, अतुल भातखळकरांनी केलेल्या टीकेवर काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

बाबो! ‘या’ माॅडेलने फक्त बेडशीट गुंडाळून केला फोटोशूट, पाहा तिचे बोल्ड फोटो

‘या’ जिल्ह्याची तिसऱ्या टप्प्यातून थेट पहिल्या टप्प्यात गरुडभरारी; उद्या सर्वकाही उघडणार

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- अमोल कोल्हे

भोरमध्ये 10 वर्षीय मुलगा केंजळ गडावरुन पडला थेट 420 फुट खोल दरीत

नागपूरकरांना मोठा दिलासा, 24 तासात शहरात कोरोनामुळे फक्त एका रुग्णाचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More