बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही आता उघड झाला’; भाजपच्या ‘या’ आमदाराची जहरी टीका

मुंबई | मुंबईमधील मेट्रो कारशेड आणि आरेवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकेर यांच्यावर निशाणा साधला आहे. आरे मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला असून ती जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचं कारस्थान चालवलं असल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

आपले तथाकथित पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरे मधून इतरत्र हलवणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरे मध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचं कारस्थान चालवलं आहे, हे अत्यंत संतापजनक असून मंत्री आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारचं पर्यावरण प्रेम हे पूर्णतः बोगस व बेगडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याचं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

आरमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाची मनाई असताना सुद्धा ठाकरे सरकारने आरेमधील तब्बल 32310 वर्ग फूटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला. इतकंच नव्हे तर हा परिसर परि-संवेदनशील क्षेत्र असताना सुद्धा केवळ बिल्डरांच्या सोबत असलेल्या ‘आर्थिक’ संवादातून हा प्रकल्प करण्याचे ठाकरे सरकारनं ठरवलं आहे. आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही उघड झाला आहे, असंही अतुल भातखळकर म्हणाले.

दरम्यान,बईकरांचे भले करणारी मेट्रो कारशेड नको, मात्र बिल्डरांचे उखळ पांढरे करून टक्केवारची सोय करणारी SRA योजना हवी, असा आरोप भातखळकरांनी केला आहे. यावर आदित्य ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“जनता हेच सर्वात मोठं न्यायालय,आता ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही”

धक्कादायक! शिक्षक महिलेने डाॅक्टर पतीला दिल्या झोपेच्या गोळा, नंतर दिला शाॅक अन्…

पत्नीला आपल्या छोट्या भावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् पुढे झालं असं काही की…

…म्हणून 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण स्लो डाऊन; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण

“पैसे दिलेच नाहीत तर मग ईडी कशाला? हा मोदी सरकारचा राजकीय छळ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More