बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. त्यांच्या नागपूरसह, वरळीच्या घरावरही ईडीने छापा टाकला आहे. याआधी सीबीआयने त्यांच्या घरावर छापा टाकला होता. अशातच या प्रकरणावरून भाजपने निशाणा साधला आहे.

अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकत आज ईडीने कारवाई केली. त्यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. आज ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली त्यात अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत, असं भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

अतुल भातखळकर यांनी टीका करताना त्यांचा रोख हा पुर्णपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे असल्याचं दिसत आहे. कारण सिल्व्हर ओक हे शरद पवारांच्या बंगल्याचं नाव आहे. तर वर्षा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बंगल्याचं नाव आहे. याचा अर्थ असा होतो की भातखळकरांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर आणि शरद पवारांवर टीका केली आहे.

दरम्यान, ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी तर, दुसऱ्या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आहे. ईडीने टाकलेल्या छाप्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

जवानानं धावत्या रेल्वेतून कोसळणाऱ्या प्रवाशाचे वाचवले प्राण, रेल्वेमंत्र्यांकडून कौतुकांचा वर्षाव

“करावं तसं भरावं, त्यामुळे राष्ट्रवादीने ईडीच्या कारवाईवर राजकारण करू नये”

“केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं”

रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा मैदानात! अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनी स्पीअर्सच्या स्वातंत्र्यची मागणी

कोरोनाच्या घातक डेल्टा प्लस विषाणूने या जिल्ह्यात पहिला बळी; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More