Top News महाराष्ट्र मुंबई

“मुंडे, मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप आणि आता मंत्री नबाव मलिकांच्या जावयाला झालेली अटक यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना टोला लगावला आहे.

धनंजय मुंडे, नवाब मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा की. जोरदार समर्थन करा आणि यात केंद्र सरकार कसे दोषी आहे हेही सांगा. लोक आतुरतेने वाट पाहत आहेत, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी टीका केली आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. हीच वेळ साधत भातखळकरांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात, अशी घणाघाती टीकाही राष्ट्रवादीवर भातखळकरांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

जावयाच्या चुकीची शिक्षा सासऱ्याला का व्हावी?- जयंत पाटी

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचं ट्विट; कटुतेवर मात करत….

व्हाॅट्सअपला धक्के सुरुच; ‘या’ बड्या कंपन्यांचा बायबाय; सिग्नलला दिली पसंती!

राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, संजय राऊतांचा भाजपला तिळगूळ!

“धनंजय मुंडे यांनी जनाची नाहीतर मनाची लाज ठेवून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या