Top News महाराष्ट्र मुंबई

“मैं देश नहीं झुकने दूंगा हेच मोदी सरकारचे ब्रीद आहे”

मुंबई | भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनेच सोडलं, असं पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी सांगितलं. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय वैमानिक अभिनंदनची सुटका न केल्यास भारताकडून तीव्र हल्ला केला जाईल या नुसत्या कल्पनेनेच भीतीने गाळण उडालेल्या पाकिस्तान सरकार आणि लष्कर अधिकाऱ्यांनी त्याची बिनशर्त त्वरित सुटका केल्याचे आता उघड झालं असल्याचं भातखळकरांनी म्हटलं आहे.

मैं देश नहीं झुकने दूंगा हेच मोदी सरकारचे ब्रीद असल्याचं म्हणत अतुल भातखळकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानी सरकारच्या मनात भारताबद्दल अशी काही भीती होती, की त्यांनी कुठलाही वेळ वाया न घालवता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तत्काळ मुक्त केलं आणि भारतासमोर गुडघे टेकल्याचं ख्वाजा मोहम्मद आसिफ म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या-

राज्यपाल म्हणाले पवार साहेबांशी बोलून घ्या- राज ठाकरे

कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही- राज ठाकरे

…म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली- राज ठाकरे

कोरोना लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

कलर्सने मुख्यमंत्र्यांना आणि राज ठाकरेंना पाठवलेल्या माफीनाम्यात ‘हा’ आहे फरक; खोपकरांची ट्विटद्वारे माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या