मुंबई | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांंच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर सावध भूमिका घेतली. यावरून भाजप नेते आणि अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी करून निर्णय घेऊ असं आधी म्हणायचं आणि नंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं म्हणून पाठीशी घालायचं हा शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंवर आरोप झाल्यावर शरद पवारांनी हे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर मनसे नेते मनीष धुरी आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आरोप करणारी तरूणी फसवणुक करत खंडणी मागून ब्लॅकमेल करत असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, इतर राजकीय पक्षातील नेत्यांनी अशा प्रकारचे आरोप केल्यानंर पवार म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करावा. आरोप आत्ता सिद्ध नाही झाले त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घेणार नाही.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी करून निर्णय घेऊ असं आधी म्हणायचं आणि नंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं म्हणून पाठीशी घालायचं हा शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही… pic.twitter.com/ppOxUenA71
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 16, 2021
थोडक्यात बातम्या-
लसीवर कोविड योद्ध्यांचा पहिला हक्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी
“भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरवल्याशिवाय राहणार नाही”
लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेनी केली मुख्यमंत्र्यांकडं ‘ही’ मागणी
…त्यावेळी ‘ओ साला धनंजय मुंडे’ म्हणत शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज त्यांच्या पाठीशी- रेणू शर्मा
धक्कादायक!!! प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत लपवला