मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यघटना आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
कुणाचा तरी मुलगा आणि कुणाचा तरी पुतण्या म्हणून राजकारणात किंमत असलेल्यांपैकी मोदी नाही, असं म्हणत भातखळकरांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
ज्यांच्या राजकारणाचे दुकान घराणेशाहीच्या खांबावर उभे आहे, त्यांनी संघराज्य, लोकशाही या विषयावर इतकं पेटून न बोललेलं बरं, असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यघटनेचा गाभा असलेल्या संघराज्य पद्धतीला जपण्याची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून केंद्राची आहे. पण आज या गाभ्यालाच तडा जातो की काय, अशी भीती वाटू लागल्याचं रोहित पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता रोहित पवार भातखळकरांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ज्यांच्या राजकारणाचे दुकान घराणेशाहीच्या खांबावर उभे आहे, त्यांनी संघराज्य, लोकशाही या विषयावर इतकं पेटून न बोललेले बरे…
कुणाचा तरी मुलगा आणि कुणाचा तरी पुतण्या म्हणून राजकारणात किंमत असलेल्यांपैकी मोदी नाही…https://t.co/U1xkkDdfMo
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 23, 2020
थोडक्यात बातम्या-
शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव- शरद पवार
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मोठा झटका!
“ताडी गंगेच्या पाण्यापेक्षा शुद्ध, ताडी प्यायल्याने कोरोना होत नाही”
…अन्यथा तुर्कीसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही- रोहित पवार
‘राजा इतना भी फकीर मत चुनो की…’; नवजोत सिद्धूंचा मोदींवर निशाणा