Top News महाराष्ट्र मुंबई

“बोरूबहाद्दर राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”

मुंबई | संजय राऊत कार्यकारी संपादक असलेल्या सामनामध्ये राऊत यांनी अग्रलेख लिहून फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिलं असल्याचा आरोप भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकरांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

रोखठोक सदरात राऊत यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. जी राज्ये फुटली ती रशियातून फुटली नव्हती तर सोव्हिएट युनियन मधून फुटली होती. देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसबरोबर सध्या राऊत गेले असल्याने त्यांना असे विचार सुचत असल्याचं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

देशातल्या फुटीरतावादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारी वक्तव्ये केल्याबद्दल राऊतांवर  देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भातखळकरांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘माझी राख गंगेत टाकू नका’; कंगणा राणावतनं केलं आणखी एक आवाहन

मोदी उद्घाटन करणार ‘वन नेशन, वन कार्ड’; पाहा काय आहे तुम्हाला उपयोग?

पार्थ पवारांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले

गॅस दर कमी केले नाही तर….; रूपाली चाकणकर आक्रमक

लाॅकडाऊनमध्ये अर्जुन कपूरसोबत…; मलायकाचा मोठा खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या