बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण हे संजय राऊतांनी आधी निश्चित करावं”

मुंबई | निवडणुक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. दिल्लीत राष्ट्रीय घडामोडींना वेग आला असताना विरोध पक्षांकडे चेहरा नाही. त्यामुळे पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार शरद पवार यांचा चेहरा योग्य आहे, असं शिवसेना संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना टोला हाणला आहे.

कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण हे महाभारतातले योद्धे संजय राऊत यांनी आधी निश्चित करावे. कधी ते उद्धव ठाकरेंच्या कोपराला गुळ लावतात, तर कधी शरद पवारांच्या, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.

संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याची अतुल भातखळकरांनी खिल्ली उडवली आहे. विरोधकांची आघाडी बनवून मोदींना पर्याय उभा करायचा असेल तर शरद पवार चेहरा आहेत. तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकतात, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचंही राऊत म्हणाले होते. त्यामुळे अतुल भातखळकर संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. यावर राऊत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

‘महाविकास आघाडी सरकार पडणार नाही’; चंद्रकांत पाटलांंचं आचंबित करणार वक्तव्य

“वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा, आम्हालाही तयारीला लागता येईल”

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याबाबत शरद पवारांनी सोडलं मौन; म्हणाले…

मिर्झा गालिब यांच्या नावानं चुकीची शायरी शेअर केल्यानं अमिताभ बच्चन झाले ट्रोल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More