मुंबई | पुरोगामी शरद पवार आपल्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारं असेल पण देशाचा कायदा मात्र वेगळेच सांगतो, असं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केल आहे.
लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, लग्न झाल्यावर दुसऱ्याशी संबंध हा गुन्हा, या निकालाचा आधार घेत भातखळकरांनी पवारांवर निशाणा साधला. याआधीही भातखळकरांनी मुंडेंच्या प्रकरणावरून पवारांवर टीका केली होती.
अत्याचार झालेल्या महिलेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करायचं आणि तिला सहानुभूती मिळणार नाही अशी व्यवस्था करून तिचे तोंड बंद करायचं. हे जुने तंत्र आहे. शरद पवारांनी या तंत्राचा रेणू शर्मा यांच्याविरोधात खुबीने वापर केला, अशी टीका भातखळकरांनी केली होती.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचा गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली होती. या आरोपांमुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र त्यानंतर संबंधित तरूणीवर इतर नेत्यांनी ब्लॅकमेलचे आरोप केले त्यामुळे शरद पवारांनी मुंडेंच्या तूर्तास राजीनामा घेणार नसल्याचं सांगितलं.
पुरोगामी @PawarSpeaks साहेब आपल्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे असेल. देशाचा कायदा मात्र वेगळेच सांगतो… https://t.co/APaRfS8LWu
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 19, 2021
थोडक्यात बातम्या-
‘सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ’; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा
“शिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायच याचा निर्णय घ्या”
शेवटी जिंकलोच!… मात्र हा व्हिडीओ करोडो भारतीयांच्या काळजाची धडधड वाढवतोय!
शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार!
ऑस्ट्रेलियन कोचनं भारतीयांबद्दल एक वाक्य असं वापरलं, ज्यामुळे त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल