Top News महाराष्ट्र मुंबई

‘धनंजय मुडेंवर आरोप करणाऱ्या तरूणीचं तोंड बंद करण्यासाठी पवारांनी ‘त्या’ जुन्या तंत्राचा खुबीने वापर केला”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचे आरोप केले. त्यानंतर विरोधी पक्षाने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांनी तरूणीवर ब्लॅकमेल केल्याचा आरोप लावला.

दोन इतर नेत्यांनी तक्रारदार तरूणीर आरोप लावल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर, पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करावी कारण तरूणीवर दुसऱ्या पक्षातील नेत्यांनीही ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुंडेंचा तूर्तास तरी राजीनामा घेणार नाही, असं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भातखळकरांनी पवारांवर टीका केली आहे.

अत्याचार झालेल्या महिलेच्या चारीत्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करायचं आणि तिला सहानुभूती मिळणार नाही अशी व्यवस्था करून तिचं तोंड बंद करायचं. हे जुने तंत्र आहे शरद पवारांनी या तंत्राचा रेणू शर्मा यांच्याविरोधात खुबीने वापर केला असल्याची टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी करून निर्णय घेऊ असं आधी म्हणायचं आणि नंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं म्हणून पाठीशी घालायचं हा शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही भातखळकरांनी याआधी केली होती.

 

थोडक्यात बातम्या- 

“छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचं आराध्यदैवत, आदर्शांचा वापर मतांची पोळी भाजण्यासाठी नाही”

“ज्यांचं बोट धरुन महाराष्ट्रात आले त्याच सेनेला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न”

‘…म्हणून शिवसेनेने नामांतराचा ‘सामना’ सुरू केला’; बाळासाहेब थोरातांचा शिवसेनेवर पलटवार 

संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही- अजित पवार

“शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता, पण…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या