महाराष्ट्र मुंबई

अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोप्प नाही; शिवसेनेच्या टीकेला भाजप आमदाराकडून प्रत्युत्तर

मुंबई |  कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आलं. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. त्यामुळे देशाला आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. केंद्र सरकार राज्याला भरीव मदत करत नाही, असा आरोप आणि केंद्राने राबवलेल्या उपाययोजनांवरून शिवसेनेने केंद्र सरकारवर टीका केली. शिवसेनेने केलेल्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे ‘मला अर्थसंकल्पातले काहीही कळत नाही’, अशी जाहीर कबुली दिली असताना मुखपत्रातून मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थशास्त्राचे बाळकडू पाजण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोपे नसते याची कृपया नोंद घ्यावी, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी टविट केलं आहे.

केंद्र सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखला आहे. त्याने काय होणार? सरकारने खासदारांचा विकासनिधी दोन वर्षांसाठी थांबवला आहे. खासदारांचे पगार कापले. हे झाले घरगुती, गावठी उपाय, पण कमाईची आणि महसुलाची कोणती नवी साधने सरकार निर्माण करत आहे?, असा सवालही शिवेसेनेने केला आहे.

दरम्यान, भाजपने दिलेल्या या प्रत्युत्तरावर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खतं पोहचवा; कृषीमंत्र्यांचे आदेश

आजपासून आणखी 5 ठिकाणी कोरोना निदान प्रयोगशाळा

राज्य सरकारचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या