मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर टीका करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनावर जोरदार निशाणा साधला आहे.
सामनाने दुनियेला सल्ले देण्यापेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधीनी अवघ्या शिवसेनेला जोड्याकडे का उभे केले आहे त्याचा विचार करावा?, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
शिवसेना संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी अभिवादन केलं नव्हतं. यावरून भातखळकरांनी शिवसेनेला टोला हाणला आहे.
दरम्यान, शिवसेनाप्रमुखांना जयंती दिनी अभिवादन न करणाऱ्या राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर, असं शब्दात भातखळकरांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
सामनाने दुनियेला सल्ले देण्यापेक्षा राहुल गांधीनी अवघ्या शिवसेनेला जोड्याकडे का उभे केले आहे त्याचा विचार करावा? शिवसेनाप्रमुखांना जयंती दिनी अभिवादन न करणाऱ्या राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 25, 2021
थोडक्यात बातम्या-
‘माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे…’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुताई सपकाळांची प्रतिक्रिया
राजस्थानात सर्वांत मोठी छापेमारी; ‘इतक्या’ कोटींचा काळा पैसा जप्त
अमृता फडणवीसांचा ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप, म्हणाल्या…
अभिनंदन!!! महाराष्ट्रातील तिघांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर
घेतलं बरं का मिटवून…. त्या चिमुकल्यांच्या भांडणाचा अखेर गोड शेवट, पाहा व्हिडीओ-
Comments are closed.