बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देशमुखांचं समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही ‘तोंड’ काळं झालं’; भाजपची जहरी टीका

मुंबई |  सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देशमुख यांनी केली होती. अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

बारमालकांकडून वसुली करणाऱ्या अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून हायकोर्टाने त्यांचे कायद्यापासून पळण्याचे मार्ग बंद केले आहेत. देशमुखांचं उठसूठ समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही तोंड काळं झालंय. वसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली आहे, अशा शब्दात अतुल भातखळकरांनी जहरी टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बदल्या आणि सचिन वाझे यांच्याबाबतच्या उल्लेखावर आक्षेप घेत तो भाग एफआयआरमधून वगळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती. मात्र न्यायालयाने हीसुद्धा याचिका फेटाळून लावली आहे.

दरम्यान, माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय द्वेषाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याचं अनिल देशमुख यांनी याचिकेमध्ये म्हटलं होतं.

 

 

थोडक्यात बातम्या- 

कोकणात पावसाचा रुद्रावतार, चिपळूण शहर पाण्यात…

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला भाजपची लाख मोलाची मदत, तब्बल 20 लाखाचं फेडलं कर्ज

‘पुण्यासाठी काहीच केलं नाही त्यांचे बॅनर ‘विकासपुरूष’ म्हणून झळकतात’; पवारांचा फडणवीसांवर निशाणा

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका!

“मला आता फोन करा, मी तुमच्यासाठी कपडे काढेन”; पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More