मुंबई | बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता करत सूट देण्याच्या घोषणेवरुन उद्धव ठाकरे यांनी घुमजाव केलं आहे. मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली परंतु बिल्डर्सना मात्र प्रीमियम मधून सूट दिली असल्याचं भातखळकरांनी म्हटलं आहे.
कारण मुंबईकर कर भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात. निर्लज्ज सरकार, अशा शब्दात भातखळकर यांनी टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, मुंबईतील गरिबांना आणि सामान्य नागरिकांना फायदा मिळू शकेल असे निर्णय घेण्याची आवश्यक असताना ठाकरे सरकारने मागील काही काळापासून बिल्डरांना फायदा मिळेल असे निर्णय घेण्याचा सपाटाच लावला असल्याचं भातखळकर म्हणाले.
500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता करत सूट देण्याच्या घोषणेवरून मा.मु उद्धव ठाकरे यांनी घुमजाव केले. मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली, परंतु बिल्डर्सना मात्र प्रीमियम मधून सूट दिली. कारण मुंबईकर कर भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात. निर्लज्ज सरकार.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 6, 2021
थोडक्यात बातम्या-
राज्य सरकारच्या ‘त्या’ चुकीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे- रावसाहेब दानवे
विधान परिषद निवडणुकीत गैरप्रकार झाला, मतदान EVM मशीनवर घ्या- चंद्रकांत पाटी
“दादा बंगालचा वाघ, भाजपमध्ये आल्यास त्याचं नक्कीच स्वागत करु”
‘होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरलात’; नाव घेता पडळकरांची शरद पवारांवर टीका