Top News महाराष्ट्र मुंबई

“सरकारी तिजोरी मंत्र्याच्या बंगल्यावर आणि दालनावर रिकामी होत आहे… बेशरम ठाकरे सरकार”

मुंबई | राज्य सरकारने मंत्र्यांचे बंगले दालनांवर केलेल्या खर्चावरून विरोध पक्षाकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. अशातच भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

आर्थिक तंगीतही मंत्र्यांचे बंगले दालनांवर 90 कोटी रुपये खर्च… शेतकरी आत्महत्या करत आहेत, पगार नाही म्हणून एसटी कर्मचारी आत्महत्या करतायेत, अंगणवाडी सेविका पगारासाठी आंदोलन करताहेत कारण सरकारी तिजोरी मंत्र्याच्या बंगल्यावर आणि दालनावर रिकामी होत आहे. बेशरम ठाकरे सरकार, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी सरकावर जोरदार टीका केली आहे.

लोकमत वृत्तपत्राने दिलेल्या बातमीचा संदर्भ देत भातखळकरांनी टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. भातखळकरांअगोदर भाजप नेते निलेश राणे यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.

दरम्यान, शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही पण बंगले चकाचक करायला आणि नवीन गाड्या घ्यायला ह्या सरकारकडे पैसे आहेत. ह्या ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे, असं राणे यांनी म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

2020 मधील शेवटचं सूर्यग्रहण आज; ‘या’ ठिकाणी पाहता येणार सूर्यग्रहण

“पर्यटन मंत्र्यांनी खाजगी पर्यटनाच्या “दिशेला” जाताना जीन्स घालावी सरकारी कामकाजात नव्हे”

मला आता आरामाची गरज आहे; कमलनाथ यांचं मोठं विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित!

“कुणाला माहिती आहे, नव्या संसद भवनाच्या निर्मितीसाठी ‘टाटा’ची कशी निवड झाली?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या