बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मेंदू तल्लख आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”

मुंबई | जगभर योगा दिन साजरा केला जात आहे. आपल्या आरोग्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे यासंदर्भात खूप संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र राजकीय वर्तुळात याचाच धागा पकडत टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त भाजपला कोणतं आसन सूचवाल?, असा सवाल संजय राऊतांना करण्यात आला होता. यावर राऊतांनी भाजपने ‘शवासन’ करावं, असं म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत. मेंदू तल्लख करणारे आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन त्यांना सुचवा अर्थात घरी बसून करता येईल असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. त्यासोबतच लॉकडॉनवरूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लॉकडाऊनच्या हट्टाची किंमत शेतकऱ्यांनी का भोगायची?, भावच नाही म्हणून जुन्नरच्या शेतकऱ्याने केळीची उभी बाग शेळ्या-मेंढ्यांना चरायला दिली. निवडणुकीपूर्वी बांधावर जाऊन केलेल्या शेतकरी हिताच्या बाता हवेत विरल्या काय?, असा सवाल भातखळकरांनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-  

“विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही”

बलात्कारासाठी महिलांचे कपडेच जबाबदार – इम्रान खान

आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?; काँग्रेसचा थेट सवाल

‘​​द ग्रेट खली’च्या आई तांदी देवी यांचं निधन

योगाने लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला – नरेंद्र मोदी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More