बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शंभर बॅनरची पीआर मात्रा हेच शिवसेनेचं कर्तृत्व’; अतुल भातखळकर यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई | कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून महाराष्ट्रात लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र लसीचा पुरवठा नसल्यामुळं राज्यातील लसीकरण लांबणीवर पडलं आहे. अशात पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहे. त्यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

फक्त बॅनरबाजी आणि पीआर बाजी ! मुंबई महापालिकेने उद्या 15 आणि 16 रोजी लसीकरण बंद असल्याचं जाहीर केलं आहे. एक लसीकरण केंद्र आणि शंभर बॅनरची पीआर मात्रा हेच शिवसेनेचं कर्तृत्व आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. लसीकरण दोन दिवस बंद असल्याची माहिती मुंबई महापालिकेने ट्वीट करत दिली होती.

मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की 15 आणि 16 मे 2021 रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, असं ट्वीट मुंबई महापालिकेने केलं आहे. लसीच्या तुटवड्यामुळे पुणे आणि मुंबई सारख्या शहरात लसीकरणाला ब्रेक लागलेला दिसत आहे.

दरम्यान, लसींच्या कमी पुरवठ्यामुळे राज्य सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. म्हणूनच 18 ते 44 वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

‘शरद पवार गेल्याची दुःखद बातमी आली अन्…’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचं पत्र चर्चेत

परवानगी नसातानाही ऑक्सिजनचा साठा करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई!

मोठी बातमी! मुंबईत पुढील दोन दिवस कोरोना लसीकरण बंद

किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यंत्रणांना केलं अलर्ट

कोरोनाच्या भीतीने मदतीसाठी कुणीही आलं नाही; पोरांनी बापाचा मृतदेह हातगाडीवरून स्मशानात नेला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More