बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त आहे का?- अतुल भातखळकर

मुंबई | भांडूपच्या ड्रीम मॉलमधल्या सनराईज रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीवर भाजपकडून संशय व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे निकटवर्तीय असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त आहे का?, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

भांडूपच्या ड्रीम मॉल मध्ये अनधिकृतपणे कोव्हिड सेंटर उभं राहत आहे याची साधी माहिती महानगरपालिकेला नसल्याचं स्वतः महापौर यांनी कबूल केलं आहे. या ड्रीम मॉलमध्ये पीएमसी बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेले वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक आहे. त्यामुळे शिवसेनेनं या मॉलवर आणि अनधिकृतपणे उभं राहिलेल्या सनराईज हॉस्पिटलवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे का? असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे. याप्रकरणी मॉल, रूग्नालयाचे संचालक आणि व्यवस्थापकीय मंडळासोबतच हा मॉल बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यासाठी ज्यांचा सहभाग आहे. त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

सनराईस रुग्णालयात रात्री 12 च्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यात 2 कोरोना रुग्णांचा समावेश असल्याच सांगितल्या जात आहे. आग अत्यंत भीषण असल्यानं आटोक्यात आणण्यासाठी 11 तास लागले. आग नियंत्रणात आली असली तरी अधूनमधून आग भडकत असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून रुग्णालयातील 61 जणांना सुखरूप बाहेर काढलं. तर आगीत अडकलेल्या चार जणांचा शोध सुरु आहे.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! मास्क न घालणाऱ्यांकडून करत होती वसुली, तेवढ्यात तीचं बिंग फुटलं!

माझा नाही तर कोणाचाच नाही! संतापलेल्या गर्लफ्रेंडने उचललं धक्कादायक पाऊल

…तर मग फडणवीसांनी जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा?- अमोल मिटकरी

अरे बापरे! रोलर कोस्टर राइडची मजा लुटताना तोंडावर आदळला पक्षी, पाहा व्हिडीओ

पुण्याच्या आयुक्त असताना ‘त्या’ खंडणी गोळा करत असायच्या; रश्मी शुक्लांवर ‘या’ नेत्याचे गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More