पुणे मनोरंजन महाराष्ट्र

“लग्नानंतर मूल जन्माला घालणं बंद केलं पाहिजे”

पुणे | गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड लोकसंख्या वाढली आहे. मूल जन्माला आलं की वस्तूंचा वापर सुरू होतो. आता वाढलेली लोकसंख्या रोखू शकत नाही. पण पर्यावरणाला वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठी नियम बदलले पाहिजेत, असं अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

लग्न केलं म्हणजे आता मूल झालंच पाहिजे. हे बदलायला हवं. मूल जन्माला घालणं बंद करायला हवं, अशी उदविग्नता अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केली केली आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

जिवंत असलेल्या पिढीने येणाऱ्या पिढीला खाईत लोटले आहे. मागे वळून बघताना आपले काय चुकले, हे लक्षात आल्यानंतरही आपण वेगळा विचार करणार आहोत का? यशाच्या व्याख्या जशाच्या तशा येणाऱ्या पिढीवर लादणार आहोत ? , असं अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझ्या लग्नाला 22-23 वर्षे झाली. पण मी मूल जन्माला येऊ दिलं नाही, त्यासाठी हे एक कारण असल्याचंही अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

…म्हणून मी गृहमंत्रिपद घेतलं- अनिल देशमुख

मोदी-शहांविरोधात बोलताना सांभाळून बोला; शेलारांची जितेंद्र आव्हाडांना ताकीद

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या