बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“झुकता है तानाशाह झुकानेवाला चाहिये”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लागू केलेले कृषी कायदे तब्बल वर्षभरानंतर मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यातच कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच या शेतकरी आंदोलनाने हिंसक वळणही प्राप्त केलं होतं. परंतु, आता हे कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रीया उमटत आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आता मोदी सरकारवर निशाणा साधत ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता हल्ला चढवला आहे. तसेच राहूल गांधी यापुर्वीच्या विधेयकांवर बरोबर होते, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमुद केलं आहे.

राहूल गांधी हे जमीन अधिग्रहण, नोटबंदी, जीएसटी, मोफत कोरोना लस आणि आता कृषी कायदे या सर्व गोष्टींबाबत बरोबर होते. असं अतूल लोंढे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच शेवटी “झुकता है तानाशाह झुकानेवाला चाहिये”, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हे कायदे रद्द केल्याबद्दल पंतप्रधानांचं तोंडभरून कौतुकही केलं होतं. त्यातच आता विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झो़ड उठली आहे.

थोडक्यात बातम्या

“आता निवडणुकांमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागल्याने कृषी कायदे मागे घेतले”

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट, पण धोका अदयाप टळलेला नाही

एसटी महामंडळाचा आक्रमक पवित्रा, तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

नवाब मलिक म्हणतात, ‘मी दुबईला जात आहे, माझ्यावर नीट लक्ष ठेवा’

कृषी कायदे रद्द करण्यामागे काय हेतू होता?, अमित शहा म्हणतात…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More